Saturday, January 6, 2018

MUSINGS FROM PRIYADARSHINI KARVE: Quest for Carbon Negativity Part 2 शोध कार्बन निगेटिव्हिटीचा भाग २

In the previous blog, I talked about how converting garden waste to char can take you towards carbon negativity, as against burning in open air or composting the garden waste. But charring also opens up other easy to use ways to reduce your personal impact on the environment. 

मागच्या ब्लॉगमध्ये बागेतल्या पालापाचोळा व काडीकचरा उघड्यावर जाळण्याऐवजी किंवा त्याचे कंपोस्ट करण्याऐवजी त्याचा कोळसा करून आपण कार्बन निगेटिव्हिटीकडे कसे जाऊ शकतो, याबद्दल मी बोलले होते. पण कोळसा आपल्याला पर्यावरणावरचा आपला व्यक्तिगत अनिष्ट परिणाम कमी करण्याचे आणखीही काही सोपे मार्ग उघडून देतो.  

* If you add the char to your garden soil, it will help retain moisture and create more space for soil bacteria to reside in. Thus, the water requirement of your garden will reduce, and your soil will become more fertile, reducing the requirement of any kind of fertilizer. As your garden becomes more efficient in producing plant biomass per unit resources put in, you are indirectly contributing to the natural process of removing carbon dioxide from air.

* जर तुम्ही हा कोळसा आपल्याच बागेतील मातीत मिसळून टाकलात, तर तो ओलावा धरून ठेवतो, आणि मातीतील जीवाणूंना रहाण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून देतो. यामुळे आपल्या बागेची पाण्याची गरज कमी होते, आपली माती अधिक सुपीक होते, आणि आपली कोणत्याही प्रकारच्या खताची गरज कमी होते. आपण मातीत घालत असलेल्या संसाधनांच्या तुलनेत जैवभार निर्माण करण्याची आपल्या बागेची कार्यक्षमता जशी वाढत जाते, तसे आपण हवेतील कार्बन डायॉक्साइड काढून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला अप्रत्यक्षरित्या हातभार लावतो. 

* Char has the capacity to capture and hold organic molecules. You can therefore use the char as organic deodorizer in your toilet, closet, or car, thereby avoid using chemical air freshners. This is another indirect contribution to reducing carbon emissions by replacing a product that is transported over long distances with a local product and also reducing air pollution. After a couple of months of use of the organic deodoriser, the char powder can be put into the soil to improve the soil quality and we also help remove the carbon from air. 

* कोळशामध्ये सेंद्रीय रेणू पकडण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आपण तयार केलेला कोळसा आपल्या स्वच्छतागृहात, बंद कपाटात, गाडीमध्ये नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून वापरू शकतो, आणि रासायनिक दुर्गंधीनाशकांचा वापर टाळू शकतो. लांबून वहातूक करून आणाव्या लागणाऱ्या उत्पादनाच्या जागी स्थानिक उत्पादन वापरूनही आपण अप्रत्यक्षरित्या कार्बन उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण थांबवण्याला हातभार लावतो. साधारण दोनेक महिने दुर्गंधीनाशक वापरल्यानंतर त्यातील कोळसा पावडर मातीत मिसळून टाकली तर मातीची सुपिकता सुधारून हवेतला कार्बन काढून घेण्याला हातभारही लावता येतोच.  

* If you process the char to make char briquettes and use these as fuel with Samuchit Steam Cooker, you can avoid using LPG or PNG as cooking fuel for at least 50% of your cooking. Both of these gases are fossil fuels and therefore contribute to carbon emission when used, without any natural return path for the carbon to come back to the earth’s surface as fossil fuels. When you burn char, you are contributing to carbon emission too, but the char we are using is made from dry leaves and twigs shed by trees and bushes. Even if we had not made any use of the garden waste, the carbon was going to go back to the atmosphere anyway. The trees and bushes from where the waste has originated are still growing, and therefore the carbon is naturally getting converted back into biomass. Thus, by using carbon that is part of a natural carbon cycle for meeting our cooking energy need, we are avoiding use of the corresponding amount of fossil fuel, and thus contributing to reducing carbon emission. 

* जर तुम्ही पालापाचोळ्याच्या कोळशावर आणखी प्रक्रिया करून कांडी कोळसा तयार केलात, तर तुम्ही समुचित स्टीम कुकरमध्ये इंधन म्हणून त्याचा वापर करू शकता. यापध्दतीने तुम्ही तुमचा किमान ५० टक्के स्वयंपाक एलपीजी किंवा पीएनजी न वापरता करू शकता. हे दोन्ही वायू खनिज इंधने आहेत, त्यामुळे त्यांचा वापर होतो तेव्हा कार्बन उत्सर्जन होते, आणि हा कार्बन वातावरणातून परत पृथ्वीतलावर खनिज इंधन या मूळ स्वरूपात आणण्याचा कोणताही नैसर्गिक मार्ग कार्बनचक्रात नाही. कोळशाच्या ज्वलनानेही कार्बन उत्सर्जन होतेच आहे, पण आपण वापरत असलेला कोळसा झाडाझडुपांवरून गळून पडलेल्या पालापाचोळ्याचा आणि काडीकचऱ्याचा बनवलेला आहे. आपण हा कचरा वापरला नसता, तरी त्यातला कार्बन या ना त्या मार्गाने हवेत जाणारच होता. या कचऱ्याचे मूळ असलेल्या झाडाझुडुपांची वाढ होतेच आहे, त्यामुळे हवेत गेलेला हा कार्बन नैसर्गिकरित्या परत जैवभारात रूपांतरित होणारच आहे. त्यामुळे नैसर्गिक कार्बन चक्राचाच भाग असलेल्या कार्बनचा जेव्हा आपण स्वयंपाकाची ऊर्जा सेवा मिळवण्यासाठी वापर करतो, तेव्हा तेवढ्या स्वयंपाकासाठी खनिज इंधनांचा वापर टाळून आपण कार्बन उत्सर्जन कमी करण्याला हातभार लावतो. 

Samuchit Steam Cooker Stove
समुचित स्टीम कुकर स्टोव्ह
Samuchit Steam Cooker Stove allows us to cook everything that is prepared by boiling and steaming (e.g., rice, pulses, steamed vegetables, idali, dhokla, boiled eggs, boiled corn, etc.). As the food gets cooked slowly and at a relatively lower temperature, it is healthier and tastier. At the same time, the stove, once set up and started the fire, does not require any attention, and therefore is a great time saver for the cook. 
MRP with taxes INR 3500. 

समुचित स्टीम कुकर स्टोव्हमध्ये आपण उकळून व वाफवून करण्याचे सर्व पदार्थ (उदा. भात, डाळ, वाफवलेल्या भाज्या, इडली, ढोकळा, उकडलेली अंडी, उकडलेले मक्याचे दाणे, इ.) तयार करू शकतो. यामध्ये अन्नपदार्थ सावकाश व कमी तापमानाला शिजत असल्याने अधिक पौष्टिक व रुचकर बनतात. त्याचवेळी, एकदा तयार करून कोळसा पेटवल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यावे लागत नाही, आणि त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याचा वेळ वाचतो. 
करासह किंमत रू.३५००. 


India has voluntarily taken on ambitious targets of reducing the country level carbon emission between 2020 and 2025, under the Paris Agreement on Climate Change that was signed in 2015. If India manages to not just meet but exceed the target, it will make us a leader in global politics in a period where climate change is increasingly taking centre stage in international negotiations around trade and technology transfer agreements. Urban Indians need to take on more responsibility to achieve this as we are contributing substantially to India's carbon emissions through our lifestyle. 

२०१५ साली जागतिक वातावरणबदलाबाबत झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरिस करारात भारताने २०२० ते २०२५ या कालावधीत आपले राष्ट्रीय कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काही महत्वाकांक्षी ध्येये स्वेच्छेने स्वीकारली आहेत. पण २०२५ पर्यंत आपण ही ध्येये गाठण्यातच नाही तर त्यांच्याही पुढे जाण्यात यशस्वी झालो, तर जिथे जागतिक वातावरणबदल वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटी आणि व्यापारी करारांतही महत्वाची भूमिका बजावतो आहे, अशा जागतिक राजकारणात आपली पत उंचावेल. आपल्या राष्ट्रीय कार्बन उत्सर्जनात शहरी भारतीयांच्या जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शहरी नागरिकांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना अधिक हातभार लावला पाहिजे. If farmers in Punjab choose to go carbon negative, they will not only support India's Climate Change Mission, but will also help solve Delhi's winter smog problem. If we in Pune embrace carbon negativity today, it will help us avoid being in the same situation as Delhi tomorrow. 

पंजाबमधील शेतकऱ्यांनीही कार्बन निगेटिव्हिटीची कास धरली, तर त्यातून भारताच्या जागतिक वातावरणबदलाबाबतच्या मोहिमेला हातभार तर लागेलच, पण दिल्लीत दर हिवाळ्यात सोसाव्या लागणाऱ्या धुक्याच्या समस्येवरही मात करण्याच्या प्रयत्नांनाही मदत होईल. पुण्यामध्ये आज आपण कार्बन निगेटिव्हिटीची कास धरली तर उद्या दिल्लीतल्या परिस्थितीसारखीच समस्या निर्माण होण्यापासून आपण बचावू शकू.  Priyadarshini Karve

Samuchit Enviro Tech, Pune


प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे#BeModernBeResponsibleBeRespectful
 Samuchit Enviro Tech         samuchit@samuchit.com         www.samuchit.com

1 comment:

Meera Rotti said...

It's good to know that Govt has set an ambitious target towards reduce carbon emissions but, what is the action plan towards achieving this? Please suggest links to read up on such plans which are being actively executed. :-)