Thursday, June 23, 2022

My City My Responsibility - River Rejuvenation Campaign#1

We at Samuchit Enviro Tech, Indian Network on Ethics and Climate Change (INECC) and Jeevitnadi Living River Foundation are opposing the Riverfront Development plan being enforced by the Pune Municipal Corporation. Since the plan totally disregards river ecology and impacts of climate change we want the project to be cancelled and a genuinely nature-aligned river rejuvenation undertaken in a democratic and transparent manner.

समुचित एन्व्हायरो टेक, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अॅंड क्लायमेट चेंज (आयनेक) आणि जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या सर्व संस्था पुणे मनपा पुढे रेटू पहात असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पात नदीची परिसंस्था व जागतिक वातावरण बदलाचे परिणाम यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्याने हा प्रकल्प रद्द करावा व लोकशाही पध्दतीने व पारदर्शकपणे सच्चे निसर्ग-पूरक असे नदी पुनरुज्जीवन हाती घ्यावे ही आमची मागणी आहे.


Image: I want to break Free!


I want to break free


Rivers have been flowing through and shaping landscapes for billions of years. Humans appeared on the scene about 2.5 hundred thousand years ago. We are infants in front of these ancient planetary miracles! 


About 12 thousand years ago, as the last ice age ended and the water started receding from land, humans started settling near the water sources – rivers and lakes. Population increased, empires grew, businesses thrived… human settlements grew… and grew and grew! Our houses and places of worship and other constructs started spilling into the flood plains of the river. To control the flooding, we built dams and embankments and tried to move the river ‘out of the way of our progress’. 


The river is ancient. She has immense patience. But our haphazard and mindless ‘progress’ has no limits which is also impacting changes in the climatic conditions locally and globally. The river is losing its patience with us now. She is getting restless. She wants to break free… and we are making even more grand plans to further constrain and chain her! 


We have to realise… we are no match for the planetary forces. The river WILL break free… and sweep away all our ‘progress’.


For more information and to participate in the movement against the PMC's riverfront development plan, please visit: https://puneriverrevival.com/


मला मुक्त व्हायचे आहे कोट्यवधी वर्षांपासून नद्या वाहत आहेत आणि भूपृष्ठाला आकार देत आहेत. सुमारे 2.5 लाख वर्षांपूर्वी मानव उदयाला आला. या प्राचीन ग्रहाच्या विस्मयकारी आविष्कारांपुढे आपण अर्भक आहोत!

सुमारे 12 हजार वर्षांपूर्वी, शेवटचे हिमयुग संपल्यानंतर आणि जमिनीवरून पाणी ओसरू लागल्याने, मानव जलस्रोतांजवळ - नद्या आणि तलावांजवळ - स्थायिक होऊ लागला. लोकसंख्या वाढली, साम्राज्ये वाढली, उद्योगधंदे वाढले… मानवी वसाहती वाढल्या… आणि वाढल्या आणि वाढल्या! आपली घरे, प्रार्थनास्थळे आणि इतर बांधकामे नदीच्या पुराच्या मैदानात हात-पाय पसरायला लागली. मग पूर आटोक्यात ठेवण्यासाठी आपण धरणे आणि बंधारे बांधले आणि नदीला ‘आपल्या प्रगतीच्या मार्गामधून दूर’ करण्याचा प्रयत्न केला.

नदी प्राचीन आहे. तिच्याकडे अपार संयम आहे. पण आपल्या अव्यवस्थित आणि बेफिकीर ‘प्रगती’ला मर्यादा नाही. यामुळे स्थानिक आणि जागतिक पातळीवरील हवामानातही बदल होत आहेत. नदी आता आपला संयम गमावत आहे. ती अस्वस्थ होत आहे. तिला मोकळे व्हायचे आहे… आणि आपण तिला आणखी रोखण्यासाठी आणि साखळबंदांत अडकवण्यासाठी आणखी भव्य योजना आखत आहोत!

आपल्याला हे समजले पाहिजे ... पृथ्वीच्या नैसर्गिक शक्तींपुढे आपण कःपदार्थ आहोत. नदी मोकळी होईल… आणि आपली सर्व ‘प्रगती’ वाहून जाईल.


अधिक माहितीसाठी आणि पुणे मनपाच्या नदीकाठ विकास प्रकल्पाच्या विरोधातील मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृपया पहा - https://puneriverrevival.com/


www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune

No comments:

Post a Comment