Friday, June 24, 2022

My City My Responsibility - River Rejuvenation Campaign#2

 We at Samuchit Enviro Tech, Indian Network on Ethics and Climate Change (INECC) and Jeevitnadi Living River Foundation are opposing the Riverfront Development plan being enforced by the Pune Municipal Corporation. Since the plan totally disregards river ecology and impacts of climate change we want the project to be cancelled and a genuinely nature-aligned river rejuvenation undertaken in a democratic and transparent manner.

समुचित एन्व्हायरो टेक, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अॅंड क्लायमेट चेंज (आयनेक) आणि जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या सर्व संस्था पुणे मनपा पुढे रेटू पहात असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पात नदीची परिसंस्था व जागतिक वातावरण बदलाचे परिणाम यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्याने हा प्रकल्प रद्द करावा व लोकशाही पध्दतीने व पारदर्शकपणे सच्चे निसर्ग-पूरक असे नदी पुनरुज्जीवन हाती घ्यावे ही आमची मागणी आहे.


Image 2 Concretization of rivers

Concrete Intoxication

Natural banks are not just a rock, soil , sand etc.. but also marshes, rocky outcrops, etc. ( under natural banks) held together by the root zones of a variety of vegetation – trees, shrubs, grasses and so on. A world of fishes, insects, birds, and many other animals thrive around this habitat.  When the river floods the WATER overflows into the flood plains (which are also natural riparian that reduce temperature, increases soil moisture and reduce evaporation losses) and eventually recedes and in the process nurtures this ecosystem. The vegetation on the riverbanks also helps reduce the speed of the overflowing water during floods reducing damage and destruction. 

But then… humans took over. Land covered by vegetation in the middle of a city? Such a waste

of space! Let’s concretise and commercialise! The natural river bank is replaced by a ‘concrete

retaining wall’ with some cosmetic vegetation to hide the concrete. But this fails to retain anything!

When it floods the water is now gushing faster! The ‘reclaimed’ land in the floodplains has rigid

concrete buildings replacing flexible firm-rooted vegetation. Submergence is now a bane rather

than a boon! 


With climate change leading to INCREASE in rainfall per episode of rain, the flooding is now

UNPRECEDENTED year on year! What is actually needed is to strengthen the natural riverbanks

– to lessen the force of flooding waters. What is being done is ‘hardscape’ concrete banks and

concrete structures - adding to the destructive power of floods! 

Are we paying taxes to PMC to destroy our beloved city?? Just think about it.   


For more information and to participate in the movement against the PMC's riverfront development plan, please visit: https://puneriverrevival.com/




काँक्रीटची नशा


नदीचा नैसर्गिक काठ म्हणजे फक्त खडक, माती, वाळू इतकेच नाही, तर झाडे, झुडुपे, गवत इत्यादी विविध प्रकारच्या वनस्पतींच्या मुळांच्या जाळ्याद्वारे एकत्र ठेवलेले दलदल, खडक, इ. घटक असतात. या नैसर्गिक संरचनेभोवती मासे, कीटक, पक्षी आणि इतर अनेक प्राण्यांची दुनिया वसलेली आहे. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा पाणी नदीच्या पूरक्षेत्रात येते (नदीचे पूरक्षेत्र ही पण एक नैसर्गिक परिसंस्था आहे - हिच्यामुळे परिसराचे तापमान कमी होते, जमिनीतील ओलावा वाढतो आणि बाष्पीभवनाने होणारा पाण्याच ऱ्हास कमी होतो) आणि नंतर ओसंडते. या प्रक्रियेत या परिसंस्थेचे पोषण होते. नदीकाठावरील वनस्पती देखील पुराच्या वेळी ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून नुकसान आणि विनाश कमी करण्यास मदत करतात. 

पण कालांतराने… माणसांनी हे क्षेत्र ताब्यात घेतले. शहराच्या मध्यभागी हरित आच्छादित जमीन? जागेचा असा अपव्यय! चला कॉंक्रीटीकरण आणि व्यापारीकरण करूया! नैसर्गिक नदीकाठाच्या जागी आता आली 'काँक्रीटची संरक्षक भिंत' आणि हे कॉंक्रिट लपवण्यासाठी कृत्रीमपणे केलेली थोडी हिरवाईची लागवड. पण ही भिंत कशाचेही संरक्षण करण्यात अपयशी ठरते! पूर आला की पाणी आता अधिक वेगाने वाहते! नैसर्गिक पूरक्षेत्रात कृत्रिमरीत्या तयार केलेल्या जमिनीवर लवचिक घट्ट रुजलेल्या वनस्पतींच्या जागी आता काँक्रीटच्या अजिबात लवचिकता नसलेल्या इमारती आहेत. जमीन जलमय होणे आता वरदान न राहता शाप बनले आहे! 

जागतिक वातावरण बदलामुळे प्रत्येक पाऊस पडण्याच्या प्रसंगी पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी पुराची तीव्रता अभूतपूर्व रित्या वाढते आहे! पुराच्या पाण्याचा जोर कमी करण्यासाठी प्रत्यक्षात नैसर्गिक नदीकाठ बळकट करणे आवश्यक आहे. पण जे केले जात आहे ते म्हणजे 'हार्डस्केप' काँक्रीटचे किनारे आणि काँक्रीटच्या इमारती - हे सारे पुराच्या विनाशकारी शक्तीमध्ये भर घालत आहेत! 

आपले लाडके शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आपण पुणे महानगरपालिकेला कर देत आहोत का? जरा विचार करा!


अधिक माहितीसाठी आणि पुणे मनपाच्या नदीकाठ विकास प्रकल्पाच्या विरोधातील मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृपया पहा - https://puneriverrevival.com/


www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune



No comments:

Post a Comment