Saturday, June 25, 2022

My City My Responsibility - River Rejuvenation Campaign#3

 We at Samuchit Enviro Tech, Indian Network on Ethics and Climate Change (INECC) and Jeevitnadi Living River Foundation are opposing the Riverfront Development plan being enforced by the Pune Municipal Corporation. Since the plan totally disregards river ecology and impacts of climate change we want the project to be cancelled and a genuinely nature-aligned river rejuvenation undertaken in a democratic and transparent manner.

समुचित एन्व्हायरो टेक, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अॅंड क्लायमेट चेंज (आयनेक) आणि जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या सर्व संस्था पुणे मनपा पुढे रेटू पहात असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पात नदीची परिसंस्था व जागतिक वातावरण बदलाचे परिणाम यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असल्याने हा प्रकल्प रद्द करावा व लोकशाही पध्दतीने व पारदर्शकपणे सच्चे निसर्ग-पूरक असे नदी पुनरुज्जीवन हाती घ्यावे ही आमची मागणी आहे.


Image 3 - Natural Rejuvenation


PMC or Rejuvenation?

Beauty is in the eye of the beholder! A structured and manicured garden may look good for
a while but will become boring soon. But the wilderness of a natural forest simply lifts your spirit! A beautiful array of built-embankments with artificially carved out spaces for human recreation makes a pleasing image indeed. But then the natural beauty of a meandering free flowing river between naturally wild riverbanks too energizes us! So how do we say what is right and what is wrong?? 
The real question to ask is not what looks beautiful on paper today but which of these images is
long lasting and sustainable say beyond a decade from now? 
Constructed structures are always trying to hold back nature. They need constant service and
maintenance. As the city’s financial fortunes ebb and flow and political priorities swing between
two extremes, the beautifully constructed structures are at a high risk of falling into disrepair in a
decade or so.
Water made artificially still will stagnate and become polluted. Natural constructs on the other hand
are by default aligned with the forces of nature. These ‘greenscapes’ will change too but in harmony
with natural forces. The free-flowing river teeming with natural life will keep on self-cleaning itself.
What the river needs is REMOVAL of human interference rather than excessive heavy-handed
attempts to ‘tame’ it! A free river will endow the settlement on its banks with beauty and serenity,
water and food security, protection from the impacts of climate change, and many more blessings! 
So think carefully! What is your choice? PMC’s plan or Ecological Rejuvenation?
For more information and to participate in the movement against the PMC's riverfront development plan, please visit: https://puneriverrevival.com/


पुणे महानगरपालिकेची योजना की नदी पुनरुज्जीवन?


सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असते! भौमितिक रचनेतील आखीवरेखीव बाग काही काळ चांगली दिसेल पण कालांतराने
कंटाळवाणी होईल. पण नैसर्गिक जंगलाचा मोकळेढाकळे पणा  मनाला उभारी देतो! बांधकामाने उभारलेल्या कृत्रीम
किनाऱ्यांची मालिका व मानवी करमणुकीसाठी त्यात केलेल्या नियोजनबध्द जागा ही डोळ्यांना सुखावणारी प्रतिमा आहे.
पण नैसर्गिक हिरवाई असलेल्या नदीकाठांमधून वळणे घेत मुक्त वाहणाऱ्या नदीचे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला ऊर्जा देते!
मग काय योग्य आणि अयोग्य हे आपण कसे म्हणायचे?? 
खरा प्रश्न आज कागदावर काय सुंदर दिसत आहे हा नाही, तर यापैकी कोणती प्रतिमा दीर्घकाळ - किमान एक दशकभर -
टिकणारी आणि शाश्वत आहे, हा आहे.  
माणसांनी बांधलेल्या रचना नेहमीच निसर्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना सतत देखभाल आणि दुरुस्तीची गरज
आहे. पुढच्या दशकभरात  शहराचे अर्थकारण चढउतारांमधून जाईल आणि राजकीय प्राधान्यक्रम दोन टोकांमध्ये झुलत
राहतील. अशा परिस्थितीत सुंदर बांधलेल्या रचना दशकभरात दुर्लक्षित होऊन मोडून पडण्याचा धोका मोठा आहे.
कृत्रिमरित्या स्थिर केलेले पाणीही या कालावधीत प्रदूषित होऊन जाईल. निसर्गाने केलेल्या रचना मुळातच निसर्गाच्या
शक्तींशी जुळवून घेत तयार होत असतात. हे 'ग्रीनस्केप' देखील बदलतील पण हे बदल नैसर्गिक शक्तींशी सुसंगत असतील.
समृध्द सजीवसृष्टीने परिपूर्ण असलेली मुक्त वाहणारी नदी स्वत:ची स्वच्छता करत राहील. आज नदीला गरज आहे ती तिला
'काबूत' ठेवण्याच्या अवाजवी प्रयत्नांऐवजी मानवी हस्तक्षेप काढून टाकण्याची! एक मुक्त नदी तिच्या काठावरील वस्तीला
सौंदर्य आणि शांतता, पाणी आणि अन्न सुरक्षितता, हवामान बदलाच्या प्रभावापासून संरक्षण आणि इतरही बरीच वरदाने देईल! 
तर मग नीट विचार करा! तुम्ही काय निवडाल? पुणे महानगरपालिकेची योजना की पर्यावरणाशी सुसंगत नदी पुनरुज्जीवन?

अधिक माहितीसाठी आणि पुणे मनपाच्या नदीकाठ विकास प्रकल्पाच्या विरोधातील मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृपया पहा - https://puneriverrevival.com/

www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune

No comments:

Post a Comment