Monday, May 29, 2023

माझं शहर माझी जबाबदारी - स्वच्छ, हिरव्या नद्या आणि बरंच काही हवं!!!!

प्रिय मित्रांनो, जागरूक नागरिकांसोबत सेल्फी!

पुणे नदी पुनरुज्जीवन (पीआरआर) चळवळीचा भाग होणे हा एक आव्हानात्मक प्रवास आहे. पुणे महापालिकेने प्रस्तावित केलेली आपल्या नदीकिनाऱ्यांवरील तथाकथित 'पुनरुज्जीवन' योजना रद्द व्हावी आणि जीवितनदी संस्थेने सुचवलेला पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावा, यासाठी जीवितनदी या संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या चळवळीत सहभागी नागरिक विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत!


नदीच्या ज्या भागात या प्रकल्पाअंतर्गत बेसुमार विनाशकारी काम सुरू करण्यात आले आहे, त्या भागात अधूनमधून फेरीचे आयोजन केले जाते. मी बंड गार्डनच्या परिसरातील अशाच एका फेरीत सहभागी झाले होते. तिथे मी ५०० मीटरपेक्षा कमी अंतरावर सुमारे ७००-१००० वृक्षांची बेकायदेशीर कत्तल पाहिली. आपण कल्पना करू शकता की या पट्ट्यालगतची झाडी किती घनदाट आहे. या ७००+ वृक्षांमध्ये चांगले वाढलेले, पन्नास वर्षे किंवा त्याहून जुने स्थानिक वृक्षही होते. या वृक्षांसोबत हजारो पक्षी, सस्तन प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीव (एक चांगली जैवविविधता) नांदत होते. यातील काही वृक्षांचे म्हणे पुनर्रोपण होणार आहे... पण इथे जे नष्ट होत आहे त्यात झुडपांपासून वृक्षांपर्यंत विविध स्तरांमध्ये वाढलेली वनश्री आहे. अगदी चांगल्या नैसर्गिक जंगलाची एक छोटी प्रतिकृतीच जणू.
कापण्यासाठी चिन्हांकित केलेले परिपक्व झाड


मात्र, विकासाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी या वनश्रीवर राडारोडा व दगड टाकून निर्दयीपणे हे जंगल नष्ट केले जात आहे. माझे सहकारी सत्या आणि उमा म्हणाले की, ते या झाडांना 'जिवंत समाधी' देत आहेत.


हे ज्या पद्धतीने होत आहे ते निव्वळ अनाकलनीय आणि अतार्किक आहे, जुनी वाढलेली सध्याची झाडे आणि घनदाट वनश्री नष्ट करून त्या जागी हिरव्या गवताचे ठिपके, ठरावीक अंतरावर नियोजन करून लावलेली  एकांडी झाडे आणि काँक्रीटच्या रचना उभ्या करण्यातून काय साध्य होते?  आपले नदीकाठ शाश्वत करण्यासाठी नक्कीच वेगळे मार्ग काढावे लागतील.बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली पडलेली झाडे आणि झुडपे

नदीपात्र कसे कार्य करते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि नदी कोणत्या परिसंस्थिकीय सेवा पुरवते याच्या मूलभूत समजेचा अभाव येथे स्पष्टपणे दिसून येतो. नदीचे पाणी जलपर्णीने भरलेले (आपल्याला नको असलेली हिरवाई) आणि दुर्गंधीयुक्त आहे. हा भाग बोट क्लबचाही भाग असल्याने येथे नौकाविहाराची व्यवस्था करण्याची योजना आहे, मात्र जोपर्यंत नद्यांमध्ये सातत्याने स्वच्छ पाणी येत नाही, तोपर्यंत त्यात बोटी चालविणे किंवा नदीतले इतर कोणतेही उपक्रम राबवणे अशक्य आहे. नदी मेली आहे, तिचे पुनरुज्जीवन करायला हवे आहे! नदीमध्ये जलपर्णी

नदीपात्रातल्या या विध्वंसाबरोबरच तिथे चालू असलेल्या कामावरील मजूरांच्या वसाहतीतील दृश्यही निराशाजनक होते. कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि लहान मुले पत्र्याच्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहत असून उन्हाच्या तीव्र लाटेला सामोरे जात आहेत. मात्र या झोपड्यांना पूर्ण वाढलेल्या झाडांच्या सावलीचाच काय तो आधार आहे. काय विडंबन आहे पहा! बांधकाम कामगारांची तात्पुरती वसाहत

कामगार व त्यांच्या कुटुंबियां अवस्था आणि नदीकाठावरील विध्वंसक काम पाहून नदीकाठ विकासाची ही सारी प्रक्रिया किती निष्काळजी आणि अज्ञानी आहे, याची जाणीव होते! नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या प्रकल्पाचा एक हेतू आहे, असे त्यांचे म्हणणे आहे, पण त्याचे प्रतिबिंब या प्रक्रियेतसुध्दा उमटलेले नाही! 


असे म्हटले जाते की आम्ही पर्यावरणवादी किंवा कार्यकर्ते किंवा जे काही नाव ते आम्हाला नावे देतात ते आम्ही सर्व विकासाच्या विरोधात आहोत… तर होय, आम्ही आहोत या असल्या विकासाच्या विरोधात! कारण हे २०२३ आहे आणि आपण अजूनही १९८० च्या दशकात असल्यासारखे काम करत आहोत. त्या काळात आपल्याला 'शाश्वतता' हा शब्द माहीत होता पण त्याचा अर्थ पुरता आकळलेला नव्हता. आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्याच लोकांना आणि आपल्या पर्यावरणाला कधीही महत्व दिले नाही, परंतु आता वेळ आली आहे की आपण स्वत: ला वाचविण्यासाठी शाश्वततेच्या आधुनिक निकषांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या विकासाच्या कल्पनेला शाश्वत विकास लक्ष्यांशी जोडून घेतले पाहिजे.  


जागतिक वातावरण बदलाच्या संकटामुळे वाढता उकाडा आणि दिवसागणिक हवामानात अचानक होणारे बदल यांना आपण सामोरे जात आहोतच. त्यात ही निष्काळजी, बेफिकीरी, पैसा कमावण्याची हाव आपल्याला परवडणारी नाही. आपली अर्थव्यवस्था भरभराटीला यावी जरूर, पण आपले पर्यावरण आणि आपले लोक यांचीही भरभराट व्हायला हवी!!!


शहरात होत असलेला हा तथाकथित विकास पाहिल्यानंतर एक जागरूक नागरिक म्हणून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे - आपण कुठे जात आहोत???


कोणत्याही सुशोभीकरणाआधी आम्हाला मूलभूत सेवांची आवश्यकता आहे, त्यापैकी काहींची ही यादी.

प्रदूषणमुक्त व सुरक्षित सुरक्षित सार्वजनिक जागा .

स्वच्छ नद्या.

खड्डेमुक्त रस्ते .

योग्य सावली असलेले सुरक्षित वाहन तळ. 

वाहतुकीचे कार्यक्षम व्यवस्थापन.

चालणे आणि सायकल चालविण्यासाठी सुरक्षित रस्ते.

फक्त आवश्यक तिथेच उड्डाणपूल (आणि आपल्या टेकड्यांचा बळी देणारे उड्डाणपूल अजिबात नकोत).

कार्यक्षम कचरा व्यवस्थापन सेवा (अर्थातच वर्गीकरण केलेला कचरा कचरावेचकांना देण्याची जबाबदारी नागरिकांची!) 100% सेंद्रिय कचऱ्याचे जागेवरच व्यवस्थापन (कंपोस्ट / बायोगॅस / बायोचार अशी तंत्रे वापरून).

सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करून या पाण्याचा बांधकामासाठी वापर करून स्थानिक गोड्या पाण्याच्या स्त्रोतांवरील भार कमी करणे. 

विजेचे कार्यक्षम, सातत्यपूर्ण आणि स्वच्छ स्त्रोत आणि शाश्वत पाणी पुरवठा. 

जेथे शक्य असेल तेथे (निवासी वसाहतींत शक्यतो १०० टक्के) पावसाचे पाणी साठवणे.

असलेले भूजलवाहक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा क्षेत्रे आणि आपल्या टेकड्या आणि नद्यांचे संवर्धन व संरक्षण. 


या यादीत आणखीही भर घातली जाऊ शकते. या गुगल फॉर्मद्वारे आपण आपल्या सूचना पाठवू शकता. 


जोपर्यंत हे सारे होत नाही, तोपर्यंत आपल्या नैसर्गिक परिसंस्थेची मोडतोड करणाऱ्या आणि गडद काळ्या भविष्याचे कृत्रिम हिरवे चित्र रंगवणाऱ्या कोणत्याही सुशोभित नदीकाठ प्रकल्पाची आपल्याला गरज नाही!


पौर्णिमा आगरकर.


PS: Marathi translation by Dr Priyadarshini Karve .


www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune


Saturday, May 20, 2023

My City My Responsibility - Need Clean, Green Rivers and much more!!!!

 Dear Friends, 

Selfie with fellow concerned citizens!

Being part of the Pune River Revival (PRR) movement has been a challenging journey. Everyday a group of concerned citizens and members of Jeevitnadi, the organisation which is spearheading this movement are striving harder from all the spheres just to ensure that the so-called 'rejuvenation' plan on our RIVERFRONT proposed by the Pune Municipal Corporation (PMC) be SCRAPPED and the ecological ALTERNATIVE suggested by Jeevitnadi team be adopted! 

Mature tree marked to be cut

Every now and then there's a walk on the stretches where the rampant devastating work has been initiated. I visited the stretch at the Bund Garden where I witnessed illegitimate cutting of almost 700-1000 trees in a stretch of less than 500 m. You can imagine how dense is the vegetation along the stretch. Among these 700+ trees there were several trees that were old grown mature heritage trees that housed thousands of birds, mammals, insects and microorganisms (a good biodiversity). There are a number of trees that are planted for transplanting blah blah...while a lot of them are shrubs forming a kind of layered vegetation, a mini version of forest setting that we generally see in a typical forest ecosystem. 

However, this vegetation is being ruthlessly cleared either by cutting or simply dumping construction debris on it in order to ensure fast tracking the DEVELOPMENT process. My fellow citizens Satya and Uma said that they are giving LIVE samadhi to these trees in Marathi it is 'Jivant Samadhi'.

The way this is taking place is simply mindless and illogical, because there's no point in clearing old grown existing trees and dense vegetation just to create newly grown green grass patches along with other manicured vegetation and concrete structures. Definitely there has to be a way out in order to make our riverfront sustainable! 


Trees and shrubs dumped under the debris

The basic LACK of understanding in HOW the riverbed functions, WHAT are its features and WHAT ecosystem services it offers can be clearly seen here. The river water is full of water hyacinth (green that we don't want) and is smelly. Since this stretch is also part of the Boat club there's plan to have boating activity here, however unless we have consistent clean running water in the rivers, boat rides or any activity along the river is worthless. The river is dead, needs restoration!  

Water hyacinth in the river

Apart from this destruction, the scene at the construction labor colony, had been a disheartening scene too. The workers, their families and young ones are residing in tin sheet temporary hutments and facing the scorching heat waves. However these hutments are being sheltered by the full grown trees demarcated to be cleared. What an irony! 

Construction workers colony

Seeing their condition and the destructive site work just gives one an understanding that how careless and ignorant is the overall process of riverfront development! They say project intends to give quality of life to the citizens but it does not reflect in the process! 

If then it is said that WE the environmentalist or activists or whatever names they call us are against development then YES, we are! Because this is 2023 and we are still functioning as if we are in the 1980's when we knew the word 'sustainability' without knowing its meaning. We never valued our people and our environment but now is the time we better adhere to the present norms and align ourselves to the Sustainable Development Goals in order to save ourselves.  

With the rising heat and abrupt changes in day to day weather because of the Climate crisis that we all are in, we cannot afford this careless, mindless, money minting attitude. Lets ensure our economy thrives but so does our environment and our people!!!

As a concerned citizen I want answers to all the so-called development happening in the city as to where are we heading???

We need our basic services in place, listing some of them below.

 • Pollution free spaces. 
 • Clean rivers.
 • Safe public spaces.
 • Pothole free roads.
 • Appropriate shaded parking spaces. 
 • Efficiently managed traffic.
 • Safe walking and cycling spaces.
 • Less or only required flyovers (and NO flyovers at the expense of our hills).
 • Efficient waste management services (segregation first by citizens of course!) with 100% organic waste managed at source (compost/biogas/biochar).
 • 100% treatment of wastewater and using this water for construction activities reducing load on local fresh water sources. 
 • Efficient, consistent and clean sources of electricity and sustainable water supply. 
 • Rainwater harvesting wherever feasible and 100% for residential complexes.
 • Conservation of existing aquifers, green spaces, heritage areas and our hills and water bodies. 

More can be added to the list. Please share your opinion on this poll: Click here

Unless we have these in place, we DON'T need any beautified riverfront that compromises our natural ecosystem services and paints artificial green picture having a dark black future!

Pournima Agarkar.

www.samuchit.com

Like/Follow/Share us on FacebookInstagramTwitter  Citizens of Sustainable Pune